Anna Hazare on Reservation | अण्णा हजारेंची मराठा आरक्षणावर काय प्रतिक्रिया आहे? | सातारा | ABP Majha
हायकोर्टाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाच्या 40 वर्षांपासून सुरु असलेल्या लढ्याला यश आलं. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चाकडून अत्यंत विराट असे 58 मुक मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर राज्य सरकारनं विधेयक पारित करुन मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिलं. मात्र, आजच्या निर्णयात कोर्टानं हे 16 टक्क्याची मर्यादा शक्य नसल्याचं सांगत, शिक्षण क्षेत्रात 12 तर नोकऱ्यांमध्ये 13 टक्के आरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. हायकोर्टाच्या या निर्णयामुळं मराठा समाजाला आणि राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.