अण्णा हजारे दिल्लीत एक दिवसाचा सत्याग्रह करणार
Continues below advertisement
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज राजघाटावरुन मोदी सरकारविरोधात आंदोलनाची घोषणा करतील, अशी शक्यता आहे. लोकपाल आणि स्वामीनाथन आयोगाकडे दुर्लक्ष केल्याने अण्णा हजारे आंदोलन छेडण्याच्या विचारात आहेत. अण्णा मागच्या तीन वर्षांपासून पंतप्रधानांना सातत्याने पत्र पाठवून लोकपाल कायद्याची अंमलबजावणी व शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी मागणी करतायत. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून फक्त कार्यवाही सुरू असल्याचे त्रोटक उत्तर देण्यात आलंय. त्यामुळे जर अण्णांनी आंदोलनाची घोषणा केली, तर त्यावर मोदी सरकार त्याला कसं प्रतिसाद देतं., हे पाहणं महत्वाचं आहे.
दरम्यान, आज अण्णा हजारे दिल्लीतच एका दिवसाचा सत्याग्रह करणार आहेत.
दरम्यान, आज अण्णा हजारे दिल्लीतच एका दिवसाचा सत्याग्रह करणार आहेत.
Continues below advertisement