अहमदनगर : जनलोकपालच्या मुद्द्यावर अण्णा हजारेंचं उद्यापासून उपोषण
अण्णा हजारे उद्यापासून दिल्लीच्या रामलीला मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. जनलोकपालच्या मुद्द्यावर जोवर ठोस आश्वासन मिळत नाही, तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असं म्हणत अण्णा हजारेंनी मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकलं आहे. गेल्या 4 वर्षात मोदी सरकारला 43 पत्रं लिहिली, मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आता आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नसल्याचं अण्णांनी म्हटलं. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी, राज्यातलं भाजप सरकार आणि गिरीश महाजनांवर जोरदार टीका केली.