
मुंबई : अंधेरीत पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया
Continues below advertisement
अंधेरीतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जवळ पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पाणीच पाणी झाल्याचं पहायला मिळाल. वेस्टर्न एक्स्प्रेस मेट्रोस्टेशनखाली रस्त्याचं काम सुरु असताना ही पाईपलाईन अचानक फुटली.. पाईपलाईन फुटल्य़ानंतर पाण्याचा इतका मोठा फोर्स होता की हे पाणी अक्षरश: मेट्रो स्टेशनच्या खालील भिंतीला स्पर्श करत होतं. पाणीचपाणी झाल्याने वाहतूकीची मोठी कोंडी झाली होती. तसेच हे पाणी दूरपर्यंत पोहोचलं होतं. अखेर काही वेळाने ही पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली.
Continues below advertisement