मुंबई : अंधेरीतून 4 कोटी 43 लाखांचा जुन्या नोटा जप्त

Continues below advertisement
अंधेरीतल्या एका हॉटेलमधून पोलिसांनी 4 करोड 93 लाख रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहे. याप्रकरणी हैदराबादहून आलेल्या तिघांना अटक करण्यात आली असून ते नोटा बदलण्यासाठी मुंबईत आले होते. नोटा घेऊन काही जण आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी  हॉटेलमध्ये जाऊन आरोपींच्या खोलीची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात 1000 आणि 500 च्या जुन्या नोटा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी ही रक्कम मोजली असता 4 कोटी 93 लाख रुपये असल्याचे समोर आले आहेत. नेमके हे पैसे या व्यक्ती कशा बदलणार होते? या नोटा कुठून आल्या याचा तपास आता एमआयडीसी पोलिस करीत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram