डुडलच्या माध्यमातून गुगलची आनंदीबाई जोशी यांना आदरांजली

गुगलने आज आनंदीबाई जोशी यांचं त्यांच्या १५३ व्या जन्मदिनी डूडल बनवून त्यांना मानवंदना दिलीए... आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर... त्यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात झाला... लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला. परंतु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १० दिवसच जगू शकला. हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. ((त्यांनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला...))१८८३ म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी "विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया" मध्ये प्रवेश मिळाला...कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुर्ण करून मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईंनी एम.डी. ची पदवी मिळवली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola