अमृतसर, पंजाब: 38 भारतीयंचे मृतदेह मायदेशी आणले
Continues below advertisement
इराकमध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी हत्या केलेल्या 38 भारतीयंचे मृतदेह घेऊन परराष्ट्र विभागाचे राज्यमंत्री व्ही. के. सिंह मायदेशी परतलेत.विशेष विमानातून सर्व मृतदेह घेऊन ते अमृतसर विमानतळावर पोहोचले. यावेळी पंजाब सरकारमधील सर्व मंत्री उपस्थित होते.. विशेष विमान कोलकात्याकडे रवाना होईल आणि पुढे पाटण्याला जाईल. त्या-त्या ठिकाणी हे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले जाणार आहेत.
जून 2014 मध्येच मोसूलमधल्या भारतीयांची आयसिसनं अपहरण करुन हत्या केली होती. नुकतीच या मृतदेहांच्या सापडलेल्या अवशेषांची डीएनए तपासणीही पूर्ण झाली. या 39 भारतीयांपैकी 31 पंजाबी होते. बादूश भागातल्या एका टेकडीवर त्यांच्या मृतदेहांचे अवशेष सापडले. दरम्यान पंजाब सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.