अमरावती : विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याच्या आरोपातून शिक्षकाची धिंड
Continues below advertisement
विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी अमरावतीच्या जनता कृषी विद्यालयातील एका शिक्षकाची संतपप्त पालकांनी धिंड काढली. संबंधित शिक्षकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याच आली आहे. हा शिक्षक गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयातील विद्यार्थिनींना अश्लिल शेरबाजी करत होता असा आरोप होतोय. संबंधित विद्यार्थीनीने याबाबत पालकांना कल्पना दिली. त्यानंतर महिलांसह पालकांनी महाविद्यालयात जावून त्या शिक्षकाला काळं फासलं, चपलांचा हार घातला आणि त्याची शहरातून धिंड काढली.
Continues below advertisement