अमरावती : बँक खात्यातून परस्पर 9 लाख रुपये लंपास

Continues below advertisement
बँक खात्यातून तब्बल 8 लाख 60 हजार रुपये लंपास झाल्याची घटना अमरावती शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे.
शहरातल्या स्टेट बँक आणि बँक ऑफ इंडिया या दोन बँकांमधल्या 9 खातेदारांनी ही तक्रार केली आहे... यातल्या एकाही खातेदाराने आपले गोपनीय क्रमांक कुणालाही दिलेले नाहीत... तरीही खात्यातून आपो आप रक्कम लंपास झाल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय...
धक्कादायक बाब ही की ही रक्कम हरियाणा, आसाम, गुडगा आणि दिल्लीतल्या एटीएम सेंटरमधून काढल्या जात असल्याचं लक्षात आलं आहे...
त्यामुळे या हायटेक चोरीच्या फंड्याचा पर्दाफाश करण्याचं आव्हान अमरावतीच्या पोलिसांसमोर आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram