अमरावती : मुख्य जलवाहिनी फुटली; अमरावती, बडनेरात 3 दिवस पाणीपुरवठा बंद
Continues below advertisement
अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे. त्यामुळे पुढचे ३ दिवस अमरावती आणि बडनेरा शहरातला पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अचानक उद्भवलेल्या या समस्येमुळे आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे.
Continues below advertisement