अमरावती : शेतकऱ्यांसाठी आंदोलनामुळे गुन्हा दाखल, रवी राणांच्या पत्नी नवनीत राणांची निर्दोष मुक्तता
2013 साली बडनेरचे आमदार रवी राणा यांना शेतकऱ्यांना सोबत घेऊन कापूस-आणि सोयाबीनच्या दरवाढीसाठी मोठं आंदोलन केलं होतं. त्यामुळे रवी राणा यांना तब्बल 9 दिवस कारागृहात राहावं लागलं होतं. दरम्यान, रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना कारागृहाबाहेर आंदोलन केलं होते. त्यावेळी नवनीत राणासह 80 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल त्या गुन्ह्याचा निकाल लागला ज्यात सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.