अमरावती : काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षाही भाजपने महाराष्ट्राची जास्त वाट लावली - बच्चू कडू
भाजप सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनंतर चोहोबाजूनं टीका होत असताना आता अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही भाजपला लक्ष केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षाही भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्राचं जास्त वाट लागली अशा शब्दात अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केली.