Golden Sweet | सोन्याचा वर्ख लावलेली सोनेरी पान मिठाई, किंमत प्रतिकिलो 4900 रुपये | अमरावती | ABP Majha

Continues below advertisement
दिवीळीनिमित्त अमरावतीचे नामांकित रघुवीर मिठाई सोन्याची मिठाई बाजारात घेऊन आलेत. सोनेरी पान असं या मिठाईला नाव देण्यात आलंय. या मिठाईला सोन्याचा वर्ख देण्यात आलाय. ग्राहकांसाठी सोनेरी मिठाईसोबत इतर प्रकारच्याही मिठाई उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामध्ये पिस्ता, केसर, अक्रोड अशा ड्रायफ्रुट्सपासून बनवेलेल्या मिठाईंचाही आस्वाद ग्राहकांना घेता येणार आहेत. शुद्ध सोन्याचा वर्क लावलेल्या या मिठाईची किंमत प्रतिकिलो 4900 रुपये अतकी आहे. रघुवीर मिठाईतर्फे मागीलवर्षी दिवाळीनिमित्त खास गोल्डन बिस्कीट मिठाई तयार करण्यात आली होती. त्यालाही ग्राहकांचा भरपूर प्रतिसाद मिळाल्याचं संचालकांनी सांगितलं. त्याच प्रकारात यावर्षी सोनेरी पान ही मिठाई तयार करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram