अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
शेतकऱ्यांना तूर खरेदीचे पैसे मिळावे यासाठी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. इथे एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार वीरेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन केलं जात आहे.