कलाकार म्हणून नसीरचा आदर, सन्मान करायलाच हवा- अमोल पालेकर | पुणे | एबीपी माझा
अभिनेते नसीरूद्दीन शाह यांच्या वक्तव्याने निर्माण झालेला वाद अजून शांत झाला नसून ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी नसरूद्दीन शाह यांची पाठराखण केली. नसीरूद्दीन शाह आणि आमिर खान यांना ट्रोल केलं जातंय कारण ते खान आहेत असं मत त्यांनी व्यक्त केलं. पालेकरांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा हा वाद पेटण्याची शक्यता आहे. प्रादेशिक सिनेमांचा मी पाठीराखा आहे. माझ्याबरोबरच्या अभिनेत्रींची भूमिका मूर्खपणाची असू नये असे मला वाटते. असं मत त्यांनी व्यक्त केलं.