स्वतंत्र पक्ष किंवा संघटना काढा, एनडीएत समावेश करुन घेऊ, अमित शाहांचा राणेंना सल्ला
Continues below advertisement
भाजपचे खेटे घालणाऱ्या नारायण राणेंचा भाजपमध्ये थेट प्रवेश करण्याऐवजी त्यांना वेगळा पर्याय दिल्याचं कळतं आहे. स्वतंत्र पक्ष किंवा संघटना काढा, एनडीएमध्ये समावेश करुन घेऊ अशी ग्वाही राणेंना खुद्द भाजपाध्यक्ष अमित शाहांनी दिल्याचं सूत्रांकडून कळतंय. दिल्लीतील बैठकीत शाहांनी अशाप्रकारचं आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र याबाबत राणेंची नेमकी प्रतिक्रिया कळू शकलेली नाही. त्यामुळे आता राणे स्वतंत्र पक्ष काढणार का हे पाहावं लागेल.
Continues below advertisement