VIDEO | नीम का पत्ता कडवा है.. लहान मुलांच्या घोषणेतील चूक प्रियांका गांधींनी सुधारली | अमेठी | एबीपी माझा
शिव्या देणं हे असंस्कृतपणाचं लक्षण मानलं जातं. पण त्याच शिव्या आपल्या भाषेत अशा काही रुळल्या आहेत, की त्या तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत मित्रमंडळींमध्ये यथेच्च वापरल्या जातात.
भांडणात तर या शिव्यांचा चाट मसाला वरुन पेरला नाही. तर भांडणही सपक होतं. पण त्याच शिव्या जर लहान मुलांच्या तोंडी आल्या तर? असंच काहीसं झालं चक्क प्रियंका गांधी यांच्या दौऱ्यात.
अमेठीमध्ये प्रियंका गांधी प्रचारासाठी फिरत होत्या. तितक्यात लहान मुलांचं एक टोळकं त्यांच्यासमोर आलं आणि सुरु झाली घोषणाबाजी. पोरांना चेव इतका चढला, की पोरांनी थेट पंतप्रधान मोदींनाच शिव्या द्यायला सुरुवात केली. पण तितक्यात प्रियंका गांधी यांनी त्यांना अडवलं.