अमेठी : राहुल गांधी राम तर मोदी रावणाच्या रुपात, अमेठीत पोस्टर वॉर

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीचा दौरा करणार आहेत. आजपासून दोन दिवस राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठीत असतील.

राहुल गांधींच्या या दौऱ्यानिमित्त अमेठीत पोस्टर वॉर सुरु झालं आहे. एका पोस्टरमध्ये राहुल गांधींना राम तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावणाच्या भूमिकेत दाखवण्यात आलं आहे.

राहुल गांधींच्या हातात धनुष्य बाण तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना दहा शीर असलेल्या रावणाच्या रुपात दाखवलं आहे.

या पोस्टरवर  ‘राहुल के रूप में भगवान राम का अवतार. 2019 में आएगा राहुल राज’, असं लिहिण्यात आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola