अंबरनाथ : खड्ड्यांचा निषेध करत व्यापाऱ्यांकडून पालिकेचं श्राद्ध
सध्या पितृपक्ष सुरु असल्यानं राज्यातल्या घराघरात पूर्वजांचं श्राद्ध घालण्यात येत आहे. अंबरनाथमध्ये मात्र खड्डेमय रस्त्यांचा निषेध करत चक्क पालिकेचं श्राद्ध घालण्यात आलं. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पालिका खड्डे बुजवण्यासाठी काहीच पावलं उचलत नाही याचा निषेध करत व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरत हे अनोखं आंदोलन केलं.