कल्याण: केडीएमसीच्या 27 गावातील दस्त नोंदणी बंद, ग्रामस्थांचं मुंडन आंदोलन
Continues below advertisement
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या २७ गावातील प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन मागच्या वर्षभरापासून बंद करण्यात आलंय. याविरोधात २७ गावातले ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समीरच्या वतीनं अंबरनाथ तहसील कार्यालयात मुंडन आंदोलन करण्यात आलं. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सभोवताली असलेल्या २७ गावांचा केडीएमसीत काही वर्षांपूर्वी समावेश करण्यात आला. मात्र या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं उभी राहिल्यानं तिथल्या प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनवर शासनानं वर्षभरापासून बंदी घातली. तरीही बांधकामं सर्रासपणे सुरूच असून त्यांना वीज आणि पाण्याचं कनेक्शन मिळत नाहीये. या सगळ्यात अनधिकृत इमारतींसोबत अधिकृत इमारतीत घर घेणाऱ्या नागरिकांनाही नाहक मनस्ताप सोसावा लागत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
Continues below advertisement