अंबरनाथ : तब्बल 20 हजार झाडं अज्ञाताने जाळली
अंबरनाथ : राज्य सरकारच्या एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेत लावलेल्या झाडांना अज्ञातांनी आग लावल्याची संतापजनक घटना अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ गावात घडली आहे. या वर्षीच्या जुलै महिन्यात कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ही झाडं लावली होती.