रायगड : पोलादपूर बस दुर्घटना : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं ट्वीट
Continues below advertisement
पोलादपूर बस अपघाताबद्दल राष्ट्पती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे. आंबेनळी घाटात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३३ जणांचा मृत्यू झाल्याचं आता स्पष्ट झालंय. तर एकजणाने बसमधून आधीच उडी मारल्यानं तो बचावल्याची माहिती मिळतेय. या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे एकूण ३४ कर्मचारी सहलीसाठी विद्यापीठाच्या बसमधून निघाले होते. महिन्यातील चौथा शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्यानं हे सर्वजण महाबळेश्वरला निघाले होते. सकाळी साडेदहा वाजता या कर्मचाऱ्यांनी प्रवासाला सुरुवात केली होती. मात्र, आंबेनळी घाटात चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस थेट ८०० फूट दरीत कोसळली. साधारण ५०० फुटावर ही बस अडकली असून, बसचा अक्षरश: चेंदामेंदा झालाय आणि मृतदेह इतस्थत: पसरले आहेत.
Continues below advertisement