रायगड : पोलादपूर बस दुर्घटना : आंबेनळी घाटातील शोधकार्याची एक्स्क्लुझिव्ह दृश्यं
रायगडच्या आंबेनळी घाटात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातील 30 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एनडीआरएफ, आरसीएफ आणि ट्रेकर्सच्या मदतीने घेण्यात आलेलं शोधकार्य थांबवण्यात आलं आहे. जवान आणि ट्रेकर्सनी शनिवारी रात्रीपर्यंत 21 मृतदेह बाहेर काढले होते. अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं, मात्र दुसऱ्या दिवशी (रविवारी) सकाळी पुन्हा मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात झाली. वर्षासहलीला निघालेली खासगी बस 800 फूट दरीत कोसळून 31 पैकी 30 जणांचा मृत्यू झाला, तर सुदैवाने एक जण बचावला. अपघातग्रस्त सर्वजण दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. कोकण कृषी विद्यापीठातील चार अधीक्षक सहलीला गेले होते, त्यापैकी तिघा जणांचा मृत्यू झाला. त्याशिवाय चार सहाय्यक अधीक्षक, नऊ वरिष्ठ लिपीक, 11 कनिष्ठ लिपीक, एक लॅबबॉय, दोन चालकांचा मृत्यू झाला.