रायगड : पोलादपूर बस दुर्घटना : आतापर्यंत 20 मृतदेह बाहेर काढण्यात यश, शोधमोहिम सुरुच

रायगडच्या आंबेनळी घाटात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातील मृतदेह बाहेर काढण्याचे काम सकाळपासून पुन्हा युद्धपातळीवर सुरु करण्यात आलंय. आत्तापर्यंत 20 मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं आहे. काल संध्याकाळी पाऊस आणि अंधूक प्रकाशामुळं रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं. सकाळपासून एनडीआरएफ आणि ट्रेकर्सचे ग्रुप युद्धपातळीवर शोधकार्य करत आहेत. दापोलीच्या कृषी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळून हा अपघात झाला होता..तब्बल ८०० फूट खोली असलेल्या दरीत ही बस कोसळली. या अपघातात एकूण ३३ जणांचा मृत्यू झालाय, तर एक कर्मचारी बचावला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola