कल्याण : अंबरनाथमध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं
रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अंबरनाथ शहरात ठिकठिकाणी पाणी साचलंय. अंबरनाथ पूर्व भागातल्या बी केबिन रोड परिसराला तर या पावसामुळे अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय.या भागातल्या एमआयडीसी बिल्डिंगमध्ये तब्बल ३ फूट पाणी साचलंय.