अंबरनाथ : अडीच वर्षांच्या मुलाचा नाल्यात पडून मृत्यू
अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. राघव असं या मृत मुलाचं नाव आहे. स्वामीनगर येथे राहणारा राघव दोन दिवसांपासून बेपत्ता होता. 21 डिसेंबर रोजी सकाळी पुलाखालच्या नाल्यात त्याचा मृतदेह आढळून आला. या पुलावरुन पडून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे