अंबरनाथ : फरसाण तयार करणाऱ्या कारखान्यावर मनसेचा हल्लाबोल
Continues below advertisement
अंबरनाथ औद्योगिक वसाहतीत निकृष्ट दर्जाचं फरसाण बनवणाऱ्या कंपनीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तोडफोड केलीय. अत्यंत घाणेरड्या वातावरणात या कंपनीत खाद्यपदार्थांच्या निर्मितीचं काम सुरु होतं. त्यामुळं मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी कंपनीतील साहित्यही फेकून दिलं. या कंपनीला कुठलाही परवाना देण्यात आला नसल्याचा स्थानिकांनी आरोप केला असून कंपनी बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे. पत्र्याचं तात्पुरतं शेड उभारुन फरसाण बनवला जात होता. शेडमध्ये उंदीर, मांजर, सरडे, माश्या यांचा सुळसुळाट होता. याशिवाय निकृष्ट साहित्य, गलिच्छ वातावरण आणि काम करणाऱ्या लोकांचं अस्वच्छ राहणीमाण यामुळं लोकांच्या जीवाशी अक्षरशा खेळ सुरु होता
Continues below advertisement