अंबरनाथ : 20 हजार झाडांच्या जळीतकांडावरुन शिवसेना-भाजप आमनेसामने
अंबरनाथ तालुक्यातल्या मांगरूळ गावात जळालेल्या 20 हजार झाडांवरुन आता शिवसेना भाजपमध्ये जुंपली आहे. राज्य सरकारच्या एक कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जुलै महिन्यात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी एक लाख झाडं लावली होती. मात्र मंगळवारी या झाडांसह संपूर्ण टेकडीला कुणीतरी आग लावली, ज्यात 20 हजार झाडं जळाली. यामागे स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांचा हात असल्याचेही आरोप झाले होते, मात्र हे सर्व आरोप भाजपने फेटाळून लावले आहेत