अंबरनाथ: दुरुस्तीसाठी काढलेल्या कर्जामुळे शाळेवर जप्तीची टांगती तलवार
Continues below advertisement
अंबरनाथमधील शिशुविकास संस्थेच्या गोखले रहाळकर शाळेचे ७०० विद्यार्थी सध्या मोठ्या विवंचनेत सापडलेत. कारण शाळेच्या दुरुस्तीसाठी संस्थेनं काढलेल्या कर्जाची परतफेड न झाल्यानं शाळेवर जप्ती येण्याची शक्यता आहे. शिशुविकास संस्थेचे अध्यक्ष सगुणानंद भडकमकर आणि रामकृष्ण भडकमकर यांनी शाळेच्या दुरुस्तीसाठी २००० साली ओरिएंटल बँकेकडून ७ लाख रुपयांचं कर्ज काढलं होतं. ते भरता न आल्यानं शाळेवर लिलावाची वेळ आली होती मात्र शिक्षक विद्यार्थी यांनी दत करत हे गंडांतर टळलं. या कर्जाचं व्याज मात्र अजूनही भरणं बाकी असून संस्थाचालकांनी ते भरण्याचा शब्द दिला होता. मात्र आता याबाबत संस्थाचालक कुठलीही ठोस भूमिका घेत नसल्यानं शाळेवर जप्ती येण्याची भीती व्यक्त होतेय. उद्या याविषयी मुंबई उच्च न्यायलयात सुनावणी होणार आहे त्यामुळे 700 विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय
Continues below advertisement