अंबरनाथ : रॉयल पार्क भागात चड्डी-बनियान गँगकडून घरावर डल्ला

Continues below advertisement

अंबरनाथमधील रॉयल पार्कमध्ये राहणाऱ्या इनामदार यांचं घरावर चड्डी बनियान गँगच्या चोरट्यांनी डल्ला मारला. लाँग विकेंड असल्यानं 25 जानेवारीला नरेश इनामदार बाहेरगावी गेले होते. त्याचवेळी घराचं कुलूप तोडून चड्डी बनियान गँगच्या चोरट्यांनी 2 लाख 37 हजार रूपयांचे दागिने लंपास केले. इनामदार २९ जानेवारीला घरी परतले तेव्हा हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता चोरटे च़ड्डी-बनियान गँगचे असल्याचं लक्षात आलं. याप्रकरणी इनामदार यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram