अंबरनाथ : शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर हल्ला, डोक्याला दुखापत
शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी अंबरनाथमध्ये घडली. प्रभाग 37 च्या नगरसेविका रेश्मा काळे यांचे पती अजित (छोटू) काळे यांच्यावर हा हल्ला झाला. यात काळे यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्रभाग 37 मध्ये रस्ता रुंदीकरण होणार असून त्यात अनेक दुकानं तुटणार आहेत. त्यातूनच हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.