Mahabharat | पंतप्रधानांची दुर्योधनाशी तुलना, प्रियांका गांधीचा मोदींवर हल्लाबोल | अंबाला | ABP Majha
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना दुर्योधनाशी केली आहे. मोदींकडून देशाचे लक्ष विचलीत करण्याचे काम सध्या सुरु असल्याची टीका प्रियंका गांधींनी केली आहे.. देशाने अहंकारी व्यक्तींना कधीही माफ केलेले नाही. इतिहास याची साक्ष देतो, दुर्योधनाचा अहंकारही असाच गळून पडला होता, असे सांगत त्यांनी कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेतील काही ओळी वाचून दाखवल्या. हरयाणातील अंबाला येथे एका प्रचार सभेत त्या बोलत होत्या. जनतेसाठी मोदींनी काय केलं, हे ते कधीही सांगत नाहीत, मात्र शहीदांच्या नावावर मत मागतात, अशा शब्दांत प्रियंकांना मोदींवर हल्लाबोल चढवलाय.