पंढरपूर/भिवंडी : अॅमेझॉनची फसवणूक करणाऱ्या अनेक डिलिव्हरी बॉयवर कारवाई

शॉपिंग साईट्सवरुन येणाऱ्या वस्तूंचे पार्सल फोडून त्यामध्ये इतर साहित्य भरुन ग्राहकांना देणाऱ्या, डिलीव्हरी कंपन्याच्या मालकांना, पंढरपूर आणि भिवंडीमधून अटक करण्यात आली आहे..
पंढरपूरमध्ये अॅमेझॉनच्या साईटवरुन बुक केलेले मोबाईल डिलीव्हरी कंपनीच्या मालक आणि डिलीव्हरी बॉयनं मधल्या मध्ये लंपास केले..हे मोबाईल विकून आलेल्या पैशातून हा ठगांनी एक टेम्पोही विकत घेतला..या ठगांना अटक कऱण्यात आली असून त्यांच्याकडून मोबाईल मिळवण्याचं काम सुरु आहे.
तर दुसरीकडं भिवंडीमध्ये अॅमेझॉनकडून ग्राहकांना येणारे पार्सल फोडून त्याऐवजी साबनाच्या वड्या त्यात भरणाऱ्या डिलीव्हरी बॉयला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत..तब्बल 2 कोटींच्या सामान या ठगांनी लंपास केल्याचं कळतंय..आतापर्यंत पोलिसांनी 27 लोकांना अटक केली असून त्यांच्याकडून 267 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola