Amazing Amboli | अद्भुत आंबोली - महाराष्ट्रातील चेरापुंजीच्या खजिन्याची सफर | ABP Majha

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे आंबोलीचा प्रसिद्ध धबधबा खळखळून वाहू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी आंबोलीला पाहायला मिळत आहे. आंबोली धबधब्यांचा आनंद लुटायचा असेल तर तुम्हाला पाऊस आणि दाट धुके पार करत या धबधब्यापर्यंत पोहोचावं लागतं. हिरवाईने नटलेल्या उंच डोंगरावरुन कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे या आंबोलीच्या घाटात पाहायला मिळत आहेत. जैवविविधतेने नटलेला, वैभव संपन्न आंबोली घाट आणि या घाटातील धबधबे सध्या पर्यटकांना भुरळ घालत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola