#MeToo वादळ मोदींच्या मंत्रिमंडळात, राज्यमंत्री एम जे अकबरांवर शोषणाचे आरोप
Continues below advertisement
MeToo वादळाने आपली कक्षा रुंदावायला आता सुरुवात केली आहे. बॉलिवूडनंतर आता राजकारणातही ‘मीटू’चं वादळ पोहोचलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार एम जे अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप होत आहे. पत्रकार प्रिया रमानी यांनी एम.जे.अकबर यांच्यावर हे आरोप केले आहेत. अद्याप एम.जे. अकबर यांनी या आरोपांबाबत आपली भूमिका मांडलेली नाही. एम.जे. अकबर सध्या केंद्र सरकारमध्ये परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री आहेत.
Continues below advertisement