UNCUT | निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन | दिल्ली | एबीपी माझा
देशातील जनतेचा पैशावर कधीही हात पडू देणार नाही, देशातील प्रत्येक व्यक्ती चौकीदार आहे. समाजासाठी काम करणाता प्रत्येकजण चौकीदाराची भूमिका बजावतो आणि देशातील जनता चौकीदाराच्या पाठिशी असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. मैं भी चौकीदार या मोहिमेची सुरुवात केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आज या मोहिमेला पाठिंबा देणाऱ्या लोकांशी संवाद साधला. त्यात व्यापारी, उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी असा समाजातील अनेक घटकांचा समावेश होता. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडलेल्या गेलेल्या लोकांच्या प्रश्नांना मोदींनी यावेळी उत्तरं दिली. एअरस्ट्राईकचं श्रेय हे माझं नसून, भारतीय वायूदलाचं असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले.