अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड, तीन नगरसेवकांसह 28 जुगारी अटकेत | एबीपी माझा
अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकली. पोलिसांच्या धाडीत तब्बल 28 जुगारींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींमध्ये अकोट नगरपालिकेतील तीन नगरसेवकांसह एका नगरसेविकेच्या मुलाचा समावेश आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी ही कारवाई केली.