VIDEO | गुढीपाडव्याचा उत्साह, महिलांच्या ढोल पथकाचं दमदार सादरीकरण | अकोला | एबीपी माझा
गुढीपाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे, डोंबिवलीसह राज्यभरातली शहरं सज्ज झाली आहेत. सकाळपासूनच गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना सुरुवात झाली आहे. ढोलताशांच्या गजरात आणि पारंपारिक पोषाखात तरुण-तरुणी शोभायात्रेत सामील झाले आहेत. विविध चित्ररथ, मर्दानी खेळ आणि लोककला यांची पर्वणी या शोभायात्रांमध्ये पाहायला मिळते आहे.