अकोला : फेसबुकवरील मैत्री महागात, 54 वर्षीय महिलेला 48 लाखांचा गंडा

Continues below advertisement
कवयित्री आणि फॅशन डिझायनर असलेल्या अकोल्यातील 54 वर्षीय महिलेला फेसबुकवरची मैत्री चांगलीच महागात पडली. कारण, फेसबुकवरून परदेशी इसमाशी मैत्री केल्यामुळे महिलेला 48 लाख 51 हजारांचा गंडा बसला.

लंडनमधील व्हिक्टर सॅम्युअल नावाच्या इसमाने या महिलेशी फेसबुकवरून मैत्री केली. मैत्री चांगलीच जमल्यानंतर दोघे व्हॉट्सअॅपवरही बोलू लागले. मात्र एक दिवस चक्क सॅम्युअलने तिला परदेशातून भारतात भेटवस्तू देणार असल्याचं सांगितलं.

भेटवस्तूंचं कुरिअर दिल्लीला कस्टममध्ये अडकल्याचं सांगत या महिलेला प्रत्येकवेळी वेगवेगळी रक्कम भरायला सांगण्यात आलं. या सर्व प्रकारात या महिलेकडून तब्बल 48 लाख 51 हजारांची रक्कम वसूल करण्यात आली.

अमेरिका, इंग्लंड तसेच अन्य विदेशी रहिवासी असल्याचं दाखवून मैत्री करण्यात येते. त्यानंतर मोठ्या विश्वासाने फोटोंची देवाण-घेवाण करून विश्वास संपादन करण्यात येतो. यासाठी एक मोठं रॅकेटच सक्रिय असल्याची माहिती आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram