अकोला:जादूटोण्याच्या भीतीपोटी बापाने 3 मुलांना संपवलं
Continues below advertisement
अकोला जिल्ह्यातलं धोतर्डी गाव काल तिहेरी हत्याकांडानं हादरलं आहे. इथं जन्मदात्या बापानेच आपल्या 3 लेकरांचा खून केला आणि स्वत: गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विष्णू इंगळे असं या आरोपीचं नाव आहे. काल रात्री सव्वाआठच्या सुमारास हा प्रकार घडला.
दरम्यान हा सगळा प्रकार जादूटोण्याच्या भितीतून घडल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
आरोपी विष्णू इंगळेवर अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विष्णूच्या पत्नीचं मागील वर्षी निधन झालं. त्यानंतर तो मानसिक धक्क्यात होता. त्यातच जादुटोण्याच्या भीतीपोटी हा प्रकार केल्याची माहिती मिळते आहे.