अकोला : आयकर विभागाची 12 ठिकाणी छापेमारी, व्यापारी वर्गात खळबळ
Continues below advertisement
अकोल्यात आयकर खात्याने एकाच दिवशी बारा ठिकाणी धाड टाकली. धाड टाकण्यात आलेले सर्वजण अकोल्यातील मोठे व्यापारी आहेत. दगडीपूल, अलंकार मार्केट आणि सिंधी कँपातील व्यापाऱ्यांच्या निवासस्थानी काल या धाडी टाकण्यात आल्या आहेत. प्रताप आहूजा, पुरूषोत्तम साधवाणी, जय लोकवाणी आणि सुनिल सावराणी अशी यातील काही व्यापाऱ्यांची नावे आहेत. दरम्यान, या धाडीसंदर्भात आयकर विभागाकडून कोणतीही अधिक्रूत माहिती देण्यात आली नाही. आजही हा तपास सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र, एकाचवेळी बारा ठिकाणी धाडी पडल्याने अकोल्यातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
Continues below advertisement