VIDEO | अकलूजमध्ये मोहिते पिता-पुत्रांचा कार्यकर्त्यांशी संवाद, भाजप प्रवेशासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता | सोलापूर | एबीपी माझा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माढ्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, विजयसिंह मोहिते आणि रणजितसिंह मोहिते भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. अकलूजमध्ये मोहिते पितापुत्र सध्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी जवळपास 5 हजार कार्यकत्यांनी हजेरी लावलीय. या बैठकीतच मोहिते पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं बोललं जात आहे. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मोहिते पाटलांना बिनधास्तपणे भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिलाय. तुम्ही फक्त निर्णय घ्या, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असा विश्वास कार्य़कर्ते मोहिते पाटलांना देताना पाहायला मिळत आहेत.