Shourya Horse | वारीसाठी सज्ज, मोहिते पाटलांचा 'शौर्य' अश्व देहूकडे रवाना | अकलूज | ABP Majha
संपूर्ण महाराष्ट्राला वरुणराजासह आषाढी वारीचे वेध लागले आहेत. वारीसाठी संत तुकाराम महाराजांची पालखी उद्या देहूवरुन पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पालखीसाठी अकलूजवरुन धवलसिंह मोहिते पाटील यांचा शौर्य नावाचा अश्व देहूकडे रवाना झाला. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात रिंगणाच्या अश्वसेवेची जबाबदारी मोहिते पाटलांकडे असते. मानाच्या रिंगण सोहळ्यात मोहिते पाटलांचा शौर्य अश्व भगवी पताका घेऊन धावतो. गेल्या 3 वर्षांपासून मोहिते पाटील परिवाराकडून ही सेवा सुरु आहे. आज पद्मजादेवी आणि त्यांचे पुत्र धवलसिंह यांनी शौर्य अश्वाची पूजा करुन त्याला देहूकडे रवाना केले.