मुंबई : अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायदा लावू नका, विधानसभेत शिवसेनेसह विरोधकही आक्रमक
Continues below advertisement
अंगणवाडी सेविकांना लावलेला मेस्मा कायदा त्वरीत रद्द करावा, यावरुन आज विधानसभेत चांगलाच गदारोळ पहायला मिळाला. मेस्मा कायदा रद्द करण्यच्या शिवसेनेच्या भूमिकेला विरोधकांनीही पाठिंबा दिला आहे. तर आक्रमक झालेल्या शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी विधानसभा अध्यक्षांचा राजदंडही पळवला आहे. याप्रकरणावरुन सभागृहात प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. अत्यंत कमी मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अत्यावश्यक सेवेखाली मेस्मा लावायचाच असेल तर त्यांनाही इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मानधन द्या, अशी मागणी शिवसेनेसह विरोधकांची आहे. मात्र महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे मेस्माच्या भूमिकेवर ठाम आहेत.
Continues below advertisement