VIDEO | पार्थ पवारांच्या विजयासाठी अजितदादा मैदानात | एबीपी माझा
पहिल्याच प्रयत्नात मुलगा पार्थच्या गळ्यात विजयाची माळ पडावी म्हणून अजित पवारांनी कंबर कसली आहे. पार्थला उमेदवारी मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर आज अजित पवारांनी पनवेलमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारालाच विजयी करण्याचं आवाहन केलं. त्यांनी थेट पार्थचं नाव घेतलं नसलं तरी उमेदवार नवखा असू शकतो असं विधान करत त्यांनी पार्थच्याच उमेदवारीचे संकेत दिलेत. मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार आहे.