अहमदनगर : शिवसैनिकांची हत्या प्रकरण : मृत संजय कोतकर यांच्या कुटुंबियांशी बातचीत

Continues below advertisement
बिहारलाही लाजवेल असा प्रकार अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान घडला. राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे शनिवारी सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करुन गुप्तीनेही वार करण्यात आले. यानंतर अहमदनगरमध्ये राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून गेलं आहे. या प्रकरणी नगरमधील अनेक दिग्गज नेत्यांना अटक करण्यात आली आहे. तर शिवसेनाही या प्रकरणावरुन आक्रमक झाली आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपच्या संगनमताने हा प्रकार घडल्याचा आरोप केला. तर संजय राऊत यांनीही पुढून वार करु असा इशारा दिला. दरम्यान, या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांनी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. यातीलच एक अहमदनगरचे माजी शहर उपप्रमुख संजय कोतकर यांच्या कुटुंबियांशी एबीपी माझाचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी बातचित केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram