EXCLUSIVE : कोपर्डी प्रकरणाचा आज निकाल, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी खास बातचित
Continues below advertisement
ज्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला, त्या कोपर्डी खटल्याप्रकरणी आज शिक्षेची सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राबरोबरच देशाचंही या खटल्याकडे लक्ष लागून आहे. आज सकाळी 11 वाजता आधी दोषी संतोष भवाळचे वकील आपला युक्तीवाद करतील, त्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद होईल. आणि यानंतर शिक्षेची सुनावणी केली जाईल. काल कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना कमीत कमी शिक्षा व्हावी. अशी मागणी बचाव पक्षांच्या वकिलानं केलीय. या प्रकरणातील मुख्य दोषी आरोपी असलेल्या जितेंद्र शिंदेंनं पीडित तरुणीला आपण मारलं नाही, असा दावा केला. आणि फाशी ऐवजी जन्मठेप देण्याची मागणी केली. तर शिंदेचा वकील योहान मकासरे यांनी आपल्या अशिलाला फाशी नको तर जन्मठेप द्यावी, अशी मागणी केली.
Continues below advertisement