Snake in Shirt | रुग्णाच्या नातेवाईकाच्या शर्टात साप घुसला, जिल्हा रुग्णालयातील प्रकार | अहमदनगर | ABP Majha

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात एका पेशंटचा नातेवाईक झोपला असताना त्याच्या शर्टात साप घुसल्याचा प्रकार समोर आला आणि एकच गोंधळ उडाला. महत्वाची बाब म्हणजे शर्टमध्ये साप घुसलेला असताना त्या व्यक्तीला जाग आली नाही. रुग्णालयातील रात्रपाळीच्या कर्मचाऱ्याला ही बाब लक्षात आली. त्याने तातडीने सर्पमित्र आकाश जाधव यांना पाचारण केलं. जाधव यांनी झोपलेल्या व्यक्तीच्या शर्टमधून साप बाहेर काढला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram