अहमदनगर : तगड्या पोलिस बंदोबस्तात छिंदमची महापालिकेच्या सभेला हजेरी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा नगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम पालिकेच्या सभेला उपस्थित राहिला. छिंदम येणार असल्याने महापालिकेबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या फौजफाट्यातच छिंदमने पालिकेत प्रवेश केला. पालिकेच्या सभेला येऊन सही केल्यानंतर छिंदम लगेच परत निघून गेला.