UNCUT | अहमदनगर | राळेगणसिद्धी | गिरीश महाजन आणि अण्णा हजारे यांची एकत्रित पत्रकार परिषद

जनलोकपाल कायद्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज राळेगणसिद्धीत उपोषणाचा इशारा दिला आहे.  मात्र त्याआधीच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीमध्ये अण्णांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत... या दोघांमधली बैठकीत काय तोडगा निघतो यावर अण्णा उपोषण करणार की नाही हे ठरणार आहे. याआधी गिरीश महाजन यांनी दोन वेळा अण्णांची भेट घेतली होती. सरकारने लोकपाल नियुक्तीसाठी समिती नेमली आहे, पण समिती नेमून काही होणार नाही, लोकपाल आणि लोकायुक्त नेमावा, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola